भुसावळ येथे राजस्थानी समाजातर्फे गणगाैर उत्सव
जळगाव लाईव्ह न्यूज । ६ एप्रिल २०२२ । भुसावळ शहरात दरवर्षाप्रमाणे यंदाही राजस्थानी समाजात गणगाैर (शिव-पार्वती) उत्सव साेमवारी माेठ्या उत्साहात साजरा झाला. हाेळीच्या सणानंतर महिला शितळा मातेची १५ दिवस पूजा-अर्चा करतात. याच पार्श्वभूमीवर राजस्थानी समाजातर्फे गणगाैर उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. त्यात महिलांचा माेठ्या प्रमाणावर सहभाग हाेता.
अग्रवाल महिला मंडळाद्वारे गणगाैर उत्सवात अपूर्व उत्साह दिसला. येथील श्री अग्रसेन भवनात येथील महिला मंडळाद्वारे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले हाेते. त्याअंतर्गत ११ मार्च राेजी महिला दिनानिमित्त महिला होमगार्ड व काेरोना रक्षक महिलांचा सत्कार करण्यात आला. येथे सर्वानुमते नवीन अध्यक्षा म्हणून ऍड.कल्पना टेमाणी यांची निवड करण्यात आली. तसेच होळी साजरी करण्यात आली. त्या अंतर्गत विविध रंगारंग कार्यक्रम तसेच फुलांची होळी व थंडाई वाटपाचे आयोजन केले हाेते. त्याच मालिकेत गणगौर उत्सवही साजरा करण्यात आला. गणगाैर गोट कार्यक्रमांतर्गत हॉटेलमध्ये स्वादिष्ट व्यंजन व मनोरंजन कार्यक्रमाचे आयोजन केले हाेते. २५ मार्चपासून दररोज संध्याकाळी लहान बालाजी मंदिरापासून मिरवणूक काढण्यात येत हाेती. साेमवारी संध्याकाळी मोठी मिरवणूक काढण्यात आली. या कार्यक्रमात अग्रवाल नवयुवक संघाच्या व अखिल भारतीय राजस्थानी समाजाच्या सहकार्याने मोठे बालाजी मंदिर येथे राजस्थानी पारंपरिक वेशभूषेत गणगौर गीत व नृत्य उत्सवात समापण करण्यात आले.
यावेळी महिला मंडळाच्या अध्यक्ष ऍड.कल्पना टेमाणी, प्रोजेक्ट चेअरमन संगीता अग्रवाल, नेहा अग्रवाल, निकिता अग्रवाल, रेखा अग्रवाल व सहयोगी सदस्य नंदा अग्रवाल, रितू अग्रवाल, संगीता सतीश अग्रवाल, रूपा अग्रवाल, कामिनी अग्रवाल, समता अग्रवाल, रुपाली अग्रवाल, शीतल अग्रवाल, पुष्पा अग्रवाल, कृष्णा अग्रवाल व समस्त राजस्थानी मंडळ कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. या प्रसंगी पुरुष मंडळीही माेठ्या संख्येने उपस्थित हाेती. उत्सवात अपूर्व उत्साह दिसून आला.