रावेर पोलिसांची मोठी कारवाई; मसाला व्यापाऱ्याला लुटणारी टोळी जेरबंद, लाखांचा मुद्देमाल जप्त

फेब्रुवारी 25, 2026 4:53 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । रावेर पोलिसांनी बऱ्हाणपूरच्या मसाला व्यापाऱ्याची गाडी अडवून ८ लाख रुपये लुटणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळून असून या प्रकरणी ७ संशयित आरोपींना बेड्या ठोकण्यात आले आहे. संशयित आरोपींकडून साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मात्र, या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार पोलिसांना हुलकावणी देऊन पसार झाला आहे.

rv

फारुख शेख रईस, अत्ताउल्लाह खान दाउद खान ऊर्फ सोनू, शेख सईद शेख कादर सुपडू, शेख समीर शेख कलीम ऊर्फ विकू, राहील खान दाउद खान, रहेमान खान अय्युब खान ऊर्फ मुन्या, अक्रम खान इस्माईल खान सर्व रा. बंडू चौक, रावेर असं अटक केलेल्या ७ संशयितांची नावं असून या कारवाईने लूटमार करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली.

Advertisements

काय आहे घटना?
बऱ्हाणपूर येथील मसाला व्यापारी दीपक सुरेश धर्मानी यांनी ६ फेब्रुवारी २०२६ रोजी त्यांचे कर्मचारी गौरव वाघ आणि तौफिक तेली यांना सावदा, फैजपूर आणि रावेर भागात वसुलीसाठी पाठवले होते. रात्री ९ वाजेच्या सुमारास खानापूर आरटीओ बॅरेलजवळ ८ ते ९ इसमांनी त्यांची दुचाकी अडवून पैशांची बॅग हिसकावून नेली होती. याप्रकरणी ७ फेब्रुवारी रोजी रावेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Advertisements

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांनी तातडीने गुन्हे शोध पथकाला तपासाचे आदेश दिले. घटनास्थळी सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने रावेर, सावदा आणि फैजपूर परिसरातील तब्बल ६७ सीसीटीव्ही फुटेज तपासले. तपासादरम्यान गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी रावेरमधील बंडू चौक परिसरातील ७ जणांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच या सातही जणांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून ९५ हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी आणि २ लाख ५५ हजार रुपये रोख, असा एकूण ३ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now