⁠ 
बुधवार, मे 1, 2024

क्रिप्टोतून लाखोंची फसवणूक करणाऱ्या टोळीचा म्होरक्या जेलबंद

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑगस्ट २०२३ । सध्या फसवणुकीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. यातून अनेकांना हजारो-लाखोंचा गंडा घातला जात आहे. अशातच जळगावच्या व्यावसायिकाला लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या एका ठकाला सायबर पोलिसांनी मुंबईतून अटक केली आहे. राकेश मिश्रा असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून ऑनलाईन फ्रॉडसाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले.

नेमका काय आहे प्रकार?
सोशल मीडियावर नागरिकांना बाहेरील देशातील कोड क्रमांवरुन मॅसेज प्राप्त होत असून त्यांना कोणीतीही गुंतवणुक न करता दररोज पाचशे ते हजार रुपये कमवा असे मॅसेज येत आहे. त्यानंतर नागरिकांना विविध टास्क देवून त्यांच्या बँकेमध्ये पाचशे ते पाच हजार पर्यंत त्यांच्या खात्यामध्ये ऑनलाईन पाठविले जातात. त्यानंतर पुन्हा प्रिपेड टास्क टास्क देवून त्यासाठी त्यांच्याकडून पैसे घेतले जातात आणि त्यावर त्यांना कमीशन देखिल दिले जाते. तसेच क्रिप्टो करन्सीत त्यांनी गुंतवणूक केल्यास त्यावर मोठा प्रमाणात नफा मिळत असल्याचे सांगून बनावट क्रिप्टो (crypto) करंन्सी ट्रेडिंग वेबसाईटवर यूजर आयडी तयार केले जाते.

या अमिषाला जळगावातील व्यावसायिक पवन बळीराम सोनवणे हे बळी पडले. त्यांनी सात विविध बँकांमध्ये सुमारे १५ लाख ३५ हजार रुपये भरुन क्रिप्टो करंन्सीमध्ये गुंतवणुक केली होती. दरम्यान, त्यांना आपली फसवणुक झाल्याचे कळताच त्यांनी लागलीच याबाबतची तक्रार सायबर पोलीसात दिली होती. त्यानुसार गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता.

या तपासादरम्यान, सायबर पोलिसांच्या पथकाला फसवणूक करणाऱ्या टोळीचा म्होरक्या राकेश मिश्रा हा मुंबईत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पथकाने मुंबईत जाऊन त्याला ताब्यात घेतलं. या गुन्ह्याचे सायबर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी तांत्रिक विश्र्लेषण केले. यात पवन सोनवणे यांनी ज्या बँक खात्यामध्ये पैसे भरले होते. ती खातील देशातील विविध राज्यांतील असल्याचे उघड झाले.

दरम्यान, संशयित आरोपीकडून विविध बँक खात्यांचे १५० चेकबुक, १७८ सीम कार्ड, १६० एटीएम कार्ड, १ इंटरनेट राऊटर, १ लॅपटॉप, १ कॉम्प्युटर सीपीयू, १० मोबाइल व एक प्रिंटर जप्त केला आहे. तसेच फिर्यादी व्यावसायिकाचे १२ लाख रुपये देखील पोलिसांनी फ्रिज केले आहे.

सावधान, +४४, +८८, +९२ या क्रमांकावरून येतात मेसेज
नागरिकांची फसवणूक करण्यासाठी ठकांची टोळी ही बाहेरच्या देशातील क्रमांकाचा वापर करते. हे क्रमांक +४४, +८८, +९२, +९७ अशा विविध देशांचे कोड असलेले क्रमांक आहेत.त्या क्रमांकावरून सुरुवातीला कोणतीही गुंतवणूक न करता दररोज ५०० ते १००० रुपये कमवा असे मेसेज पाठवले जातात.