गणेशोत्सव : भुसावळात मिरवणुकीवर फिरत्या कॅमेर्यांची नजर
Bhusawal News-जळगाव लाईव्ह न्यूज । ८ सप्टेंबर २०२२ । भुसावळ शहरात सर्वच जाती-धर्माचे लोक गुण्या-गोविंदाने राहतात शिवाय शहराला मोठा इतिहास असून हा इतिहास कायम राखण्यासाठी गणेशोत्सव मिरवणुकीत कार्यकर्त्यांनी कायदेशीररीत्या नियमांचे पालन करावे अन्यथा नियम धाब्यावर बसवणार्यांची पोलिस प्रशासन गय करणार नाही, असा सज्जड इशारा अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी दिला.
गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीसंदर्भात शहरातील प्रभाकर हॉलमध्ये गणेशोत्सव मंडळ पदाधिकार्यांची बुधवारी दुपारी 12 वाजता बैठक झाली. याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, शहर निरीक्षक गजानन पडघम, तालुका पोलिस निरीक्षक विलास शेंडे, शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक निरीक्षक स्वप्निल नाईक आदी उपस्थित होते.
अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी म्हणाले की, दोन वर्ष कोरोनाच्या संकटानंतर यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. उत्सव काळात कुणाच्याही भावना दुखावणार नाहीत याची सर्वांनीच काळजी घ्यावी शिवाय भुसावळ शहर हे देशाचे प्रतिबिंब असून पोलिस केवळ कायद्याची अंमलबजावणी करतात त्यामुळे कुणीही कायदा हातात घेवू नये अन्यथा पोलिस कायदेशीर कारवाई करतील, असा इशारा त्यांनी दिला. मटण मार्केट बंद ठेवण्यासह मद्य विक्रीची दुकानेदेखील बंद असतील असेही त्यांनी सांगितले.
डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे म्हणाले की, दिडशे मंडळांपैकी 41 मंडळे मुख्य मिरवणूक मार्गावर असतील. शहरातील जामा मशीदीजवळ प्रत्येक मंडळाला ठरावीक वेळ देण्यात येईल शिवाय या ठिकाणी ग्रीन व रेड लाईट लावून तशा सूचना मंडळांना वेळ संपल्यानंतर मिळतील तसेच या ठिकाणी प्रशासनातर्फे वाद्य वाजवले जातील व प्रत्येक मंडळाला जामा मशिदीजवळ एक आरती व एक गाणे असे वाजवून पुढे मार्गक्रमण करावे लागेल. मिरवणुकीत काही गैरप्रकार केल्यास अशा मंडळाला पुढील वर्षी मुख्य मिरवणुकीत सहभागाची परवानगी मिळणार नाही, असेही त्यांनी बजावले. जळगाव रोड हा जाण्या-येण्यासाठी एकतर्फी करण्यात येईल तसेच विसर्जन करून आल्यानंतर कार, रीक्षा, मोटरसायकल यांना रेणुका माता मंदिर, टिंबर मार्केट व शिवाजी पुतळा या मार्गे शहरात प्रवेश करता येईल.
गणेशोत्सव मिरवणूकीमुळे यंदा बसस्थानक डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानाऐवजी वरणगावरोडवरील एसटी डेपोत स्थलांतरीत होईल. मिरवणूक मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे, वीजपुरवठ्यासाठी स्वतंत्र जनरेटर, तापीनदीत आपत्ती व्यवस्थापनासाठी बोट व 50 जीवनरक्षक आदी तैनात केले जाणार आहेत. यंदा तापी नदीतील राहूल नगर घाटावर गणेशमुर्तीचे विसर्जन करता येईल. शहरातील नृसिंह मंदिर, डिस्को चौक, अप्सरा चौक, मरिमाता मंदिर, जामा मशिद लक्ष्मी चौक, सराफ बाजार, गांधी चौक या प्रमुख मार्गांना जोडणार्या सर्व लहान मोठ्या रस्त्यांवर बॅरीकेटींग करुन ते वाहतूकीसाठी बंद केले जातील. मिरवणूक मार्गावरील इतर सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक सकाळपासून बंद केली जाणार असल्याने जामनेररोड, स्टेशनरोड या मार्गाचा वापर केला जाईल.
सीसीटिव्ही कॅमेर्यांची नजर