⁠ 
मंगळवार, एप्रिल 23, 2024

गोदावरीतील चांद्रयान-३ देखाव्याने वेधले सर्वांचे लक्ष

जळगाव लाईव्ह न्यूज : १९ सप्टेंबर २०२३ : सर्वत्र गणरायच्या आगमनाचा उत्साह दिसून येत आहे. पारंपारिक पद्धतीने ढोल, ताशांच्या गजरात गणपतीच्या मिरवणुका निघाल्या आहेत. गोदावरी फाऊंडेशन संचलित विविध महाविद्यालये शैक्षणिक संस्थांमध्ये आज विद्यार्थ्यांनी श्री गणरायाची विधीवत प्रतिष्ठापना केली. येथील विद्यार्थीनींनी यावर्षी पर्यावरण पूरक वस्तूंचा वापर करून उत्कृष्ट असा चांद्रयान ३ चा देखावा यावर्षी लक्ष वेधून घेत आहे.

गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात लाडक्या बाप्पांचे जल्लोषात स्वागत

गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड रिसर्च जळगाव महाविद्यालयात गणपती बाप्पाचे जल्लोषात स्वागत झाले. सकाळी ९ वाजता महाविद्यालयातील सर्व अभ्यासक्रमाच्या च्या विद्यार्थ्यानी विधिवत प्राणप्रतिष्ठा केली. महाविद्यालयाच्या एम.बी.ए, एम.सी.ए, बी.बी.ए व बी. सी.ए च्या सर्व विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला.

Gimr Womens College photo 3
गोदावरीतील चांद्रयान-३ देखाव्याने वेधले सर्वांचे लक्ष 1

महाविद्यालयामध्ये गणेशोत्सव सात दिवस साजरा करण्यात येणार असून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांनी यावर्षी पर्यावरण पूरक वस्तूंचा वापर करून उत्कृष्ट असा चांद्रयान ३ चा देखावा व सजावट केली आहे. संपूर्ण कार्यक्रमाचे कामकाज प्रा.चारूशीला चौधरी यांनी केले. या कार्यक्रमास डॉ. प्रशांत वारके, डॉ. निलीमा वारके यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

डॉ. वर्षा पाटील महिला महाविद्यालयात चांद्रयान-३ चा देखावा

गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अँप्लिकेशन,जळगाव महाविद्यालयात गणपती बाप्पाचे जल्लोषात स्वागत झाले. सकाळी ९ वाजता महाविद्यालयातील बी. सी. ए. अभ्यासक्रमाच्या विद्यार्थीनींनी विधिवत प्राणप्रतिष्ठा केली. महाविद्यालयामध्ये गणेशोत्सव सात दिवस साजरा करण्यात येणार असून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. विद्यार्थीनींनी यावर्षी पर्यावरण पूरक वस्तूंचा वापर करून उत्कृष्ट असा चांद्रयान ३ चा देखावा व सजावट केली आहे. संपूर्ण कार्यक्रमाचे कामकाज प्रा. योगिता घोंगडे यांनी केले. या कार्यक्रमास प्राचार्या डॉ. निलीमा वारके यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Gimr Womens College photo
गोदावरीतील चांद्रयान-३ देखाव्याने वेधले सर्वांचे लक्ष 2

अन्नपूर्णालयम येथे डॉ.केतकी पाटील – डॉ.वैभव पाटील यांच्याहस्ते पूजन

डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरातील अन्नपूर्णालयम येथे आज दिनांक १९ सप्टेंबर रोजी शुभ मुर्हूर्तावर डॉ.केतकी पाटील व डॉ.वैभव पाटील या दांम्पत्याच्याशुभहस्ते गणपती बाप्पाचे विधीवत पूजन करण्यात आले. याप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील, मेडिकल सुपरिटेडेंट डॉ.प्रेमचंद पंडित, अधिष्ठाता डॉ.एन.एस.आर्विकर, डॉ.माया आर्विकर, डॉ.रॉय यांच्यासह मान्यवर उपस्थीत होते. याप्रसंगी पौराहित्य डी.टी.राव यांनी केले. यावेळी अन्नपूर्णालयममधील संपूर्ण स्टाफने गणपती बाप्पाच्या नामाचा गजर केला.

PHOTO 2023 09 19 11 27 32 1
गोदावरीतील चांद्रयान-३ देखाव्याने वेधले सर्वांचे लक्ष 3

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय येथे दि. १९ सप्टेंबर २०२३ रोजी जल्लोषात ढोल ताशांच्या गजरात महाविद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी गणपती बाप्पाचे वाजत गाजत स्वागत केले. गणपती मूर्तीची प्राणप्रतिष्ठा महाविद्यालयातील अतुल खोंडे यांनी सपत्नीक केली. याप्रसंगी गोदावरी फाउंडेशनच्या सचिव डॉ. वर्षा पाटील व सदस्य डॉ. केतकी पाटील, डॉ.वैभव पाटील (डी एम कार्डिओलॉजी), महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, प्रा.दीपक झांबरे (तंत्रनिकेतन समन्वयक) यांच्यासह सर्व विभाग प्रमुख व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. मिरवणुकी दरम्यान विद्यार्थ्यांमध्ये कमालीचा उत्साह जाणवत होता. पाच दिवस स्पर्धांचे महाविद्यालयामध्ये हा गणेशोत्सव पाच दिवस साजरा करण्यात येणार आहे. गणेशोत्सवा निमित्त महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम आणि स्पर्धा राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये दिनांक २० सप्टेंबर रोजी रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे व या स्पर्धेसाठी थीम म्हणून गणपती व चंद्रयान ३ या विषयांची निवड करण्यात आली आहे.

eng photo
गोदावरीतील चांद्रयान-३ देखाव्याने वेधले सर्वांचे लक्ष 4

हा कार्यक्रम प्रा. प्रिया इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येणार आहे. दिनांक २१ सप्टेंबर रोजी शाडू मातीचा गणपती बनवण्याची स्पर्धा घेण्यात येणार आहे. हा कार्यक्रम प्रा. वैष्णवी नारखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली होईल. गणेशोत्सव साजरा करण्यासाठी महाविद्यालयामध्ये श्री गणेश उत्सव विद्यार्थी समिती नेमण्यात आली आहे. त्यामध्ये तुषार पाटील, हेमंत झांबरे, आशिष पाटील, हिमांशू पाटील, अभिजीत पवार, हिमाक्षी राणे, दिपाली खोडके, सानिका राजकुळे व प्राची गिरासे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तसेच त्यांच्या सोबतीने महाविद्यालयाचे सर्वच विद्यार्थी या उत्सवात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविणार आहेत. प्रा. आर व्ही पाटील, प्रा. सचिन महेश्री व प्रा. चंद्रकांत शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी समिती कार्य करीत आहे.गणपती बाप्पांच्या प्राणप्रतिष्ठे प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.