जळगाव लाईव्ह न्यूज । ४ सप्टेंबर २०२२ । जळगाव शहर पोलिसांत दाखल गुन्ह्यातील खंडणी मागणारा व जबरीने चोरी करणाऱ्या आरोपीस अखेर पोलिसांनी अतिशय शितीफिने पकडले आहे. दरम्यान, आरोपीतांने गुन्हा केल्याची कबुली दिली असून मंदर आरोपीतास पुढील कारवाई कामी जळगांव शहर पो.स्टेला हजर केले आहे.
जळगांव -जळगांव शहर पो.स्टे. शिवाजी नगर हुडको भागात दि.३१/०८/२०२२ रोजी रात्री ०८.३० वा.सु.// आरोपी नामे अजीज खान बाबु खान पठाण रा. गेंदालाल मिल जळगांव याने गेंदालाल मिल कॉम्पलेक्स मधील बाळासाहेब लक्ष्मण पाटील यांचे रामकृष्ण मेडीकल दुकानावर जावुन कंबरेला असलेला चॉपर टेबलावर ठेवुन महिना ५००० द्यावा लागेल अशी धमकी दिली असता फिर्यादी यांनी नकार दिला असता तुला धंदा करू देणार नाही अशी धमकी देवून चापटाबुक्यांनी मारहाण करुन मेडीकल दुकानाचे गल्यातील ८,५००/- रुपये रोख जबरीने काढुन नेले म्हणुन जळगाव शहर पो. स्टेला गुरन २८२/२०२२ भादंवि कलम ३९४.३८४,३८५,३२३,५०६ प्रमाणे दाखल आहे.
सदर गुन्हयाचे गांभिर्य लक्षात घेता मा. पोलीस अधिक्षक श्री. डॉ. प्रविण मुंढे सो, मा. अपर पोलीस अधिक्षक सो श्री. चंद्रकांत गवळी, मा. पोलीस उपअधिक्षक सो श्री कुमार चिथा जळगाव भाग जळगाव यांनी जळगांव शहर पो.स्टे. चे पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड सो यांना सदर आरोपीचा लवकरात लवकर शोध घेवून कारवाई करणे बाबत आदेश दिल्याने त्यावरुन मा. पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड सो यांनी सदर गुन्हयातील आरोपीताचा शोध घेण्याकरीता जळगांव शहर पो.स्टे कडील पोउपनिरी श्री अरुण सोनार, पोउपनिरी दत्तात्रय पोटे पोहेकॉ / विजय निकुंभ, पोहेकॉ / भास्कर ठाकरे पोहेकॉ उमेश भांडारकर, पोना / प्रफुल्ल धांडे, पांना / राजकुमार चव्हाण. पोना/योगेश बोरसे, पोकॉ/योगेश इंधाटे, पोकों/रतन गिते अशांचे पथक तयार करुन सदर आरोपीचा शोध घेणेकरीता जळगांव शहरात रवाना केले सदर पथकाने गुप्त बातमीदाराकडुन माहिती काढुन सदर गुन्हयातील आरोपी नामे अजीज बाबुखान पठाण वय ३८ रा. गेंदालाल मिल जळगांव. हा गेंदालाल मिल भागात फिरत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळ्यानं सदर पथकाने जळगांव शहरातील गेंदालाल मिल गेट नं.१ समोर सापळा लावून सदर आरोपीतास अतिशय शितीफिने पकडले व सदर आरोपीतांने गुन्हा केल्याची कबुली दिली असुन मंदर आरोपीतास पुढील कारवाई कामी जळगांव शहर पो.स्टेला हजर केले आहे.
सदर आरोपी नामे अजीज बाबुखान पठाण वय ३८ रा. गेंदालाल मिल जळगांव. गेंदालाल मिल भागात दहशहत माजवत असल्याने त्यास गेंदालाल मिल भागात घेवून जावुन त्याचे कडुन गुन्हयातील हत्यार जप्त करण्यात आले असुन अशा प्रकारे अजुन कोणास सदर आरोपी किंवा इतर कोणीही धमकावत असल्यास किंवा जबरदस्ती करीत असल्यास मा. पोलीस निरीक्षक श्री विजयकुमार ठाकुरवाड यांनी जळगांव शहर पो.स्टेला तक्रार देण्याचे आव्हाण केले आहे.