पाचोऱ्यात हिटरचा शॉक लागल्याने फर्निचर कारागिराचा मृत्यू

मार्च 12, 2026 2:25 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । बाथरूममध्ये वॉटर हिटरचा शॉक लागल्याने एका ४४ वर्षीय फर्निचर कारागिराचा मृत्यू झाल्याची घटना पाचोरा शहरातील हनुमान नगर येथे घडली. आहे. धनराज सुखदेव मिस्तरी असे मृताचे नाव असून घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

two children die of cooler shock

धनराज मिस्तरी हे हनुमान नगर भागात आपल्या कुटुंबासह वास्ताव्यास आहेत. बुधवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास ते घरातील अंघोळीसाठी गेले बाथरूममध्ये असता बाथरूममध्ये असलेल्या वॉटर हिटरचा स्पर्श झाल्याने त्यांना विजेचा शॉक लागला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. धनराज मिस्तरी यांना तातडीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मिस्तरी यांना मृत घोषित केले.

Advertisements

घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पोलिस निरिक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदिप राजपूत हे करीत आहेत.

Advertisements

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now