जळगाव लाईव्ह न्यूज । २५ सप्टेंबर २०२१ । मुक्ताईनगर तालुक्यातील चारठाणा येथे रविवार दि.२६ रोजी ‘सोहळा मैत्रीचा क्षण आठवणींचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून फोटोग्राफी, व्हिडीओग्राफीमध्ये विशेष योगदान देणाऱ्या फोटोग्राफर व व्हिडीओग्राफर यांना या कार्यक्रमात पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
मित्रांनी मित्रांसाठी आयोजित केलेल्या ‘सोहळा मैत्रीचा क्षण आठवणींचा’ या कार्यक्रमाचे हे तिसरे वर्ष असून यंदा रविवार दि.२६ रोजी सकाळी ९.३० वाजता चारठाणा (ता. मुक्ताईनगर) येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमात अहमदनगर, पुणे, जालना, अंबेजोगाई, बीड, उस्मानाबाद, नागपूर, सातारा, कोल्हापूर यांसह राज्यभरातून फोटोग्राफर व व्हिडीओग्राफर बांधव सहभागी होणार आहेत. कार्यक्रमादरम्यान, फोटोग्राफी, व्हिडीओग्राफीमध्ये विशेष योगदान देणाऱ्या फोटोग्राफर व व्हिडीओग्राफर यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. कार्यक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या छायाचित्रकार बंधूना http://sohalamaitricha.com या संकेतस्थळावर जाऊन आपले रजिस्ट्रेशन करून कार्यक्रमात सहभागी होता येणार आहे. विनोद चौधरी, संजय खर्चे, अभिनय नाईक, रवी महाजन, अनिल पाटील, योगेश शर्मा, सुनील महाजन, संदीप धामोडे, मनोज पाटील, पप्पू शेठ, किरण पाटील, डिगंबर जाधव यांच्यातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. छायाचित्रकार बंधूनी मोठ्या संख्येने कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन योगेश सूर्यवंशी यांनी केले आहे.