“द कश्मीर फाइल्स” चित्रपट करमुक्त करा : युवासेना
जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मार्च २०२२ । ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) हा सिनेमा सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवर देखील या सिनेमाने धुमाकूळ घातला आहे. या सिनेमाचे जगभरातून कौतुक होत आहे. सिनेमा पाहताना प्रेक्षकदेखील भावूक होत आहेत. काश्मीरमधील काश्मिरी पंडितांवर जम्मू काश्मीर लिब्रेशन फ्रंटच्या दहशतवाद्यांनी केलेले अमानुष अत्याचार आणि आजच्या तरुणांच्या मनात सुरू असलेल्या संघर्षाची कथा या सिनेमात दाखवण्यात आली आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी पिडीत काश्मिरी पंडितांच्या मुला-मुलींसाठी महाराष्ट्रातील अभियांत्रिकी महाविद्यायात प्रवेशासाठी विशेष आरक्षण दिले होते जे आजपर्यंत सुरु आहे. हे चित्रपट महाराष्ट्र सरकारने करमुक्त करावे अशा मागणीचे निवेदन युवासेना जळगाव महानगरतर्फे अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांना देण्यात आले.
यावेळी युवासेना महाराष्ट्र राज्य सहसचिव विराज कावडीया, युवासेना जिल्हायुवाधिकारी शिवराज पाटील, महानगर युवाधिकारी स्वप्नील परदेशी, विशाल वाणी, उप-महानगर युवाधिकारी यश सपकाळे, हितेश ठाकरे, गिरीश सपकाळे, विभाग युवाधिकारी चेतन कापसे, अमोल मोरे, युवासैनिक अमित जगताप शंतनू नारखेडे, प्रीतम शिंदे आदी उपस्थित होते.