⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

आनंदाचा शिधा : 100 रूपयांत एक किलो रवा, चणाडाळ, साखर, खाद्यतेल; वाचा सविस्तर

जळगाव लाईव्ह न्यूज | १५ सप्टेंबर २०२३ | दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. डाळीही महागल्या आहेत. खाद्यतेलाचे दर आवाक्यात असले, तरी गोरगरिबांना ते परवडणारे नाहीत. त्यामुळे आनंदाचा शिधा वाटपाचा निर्णय शासनाने घेतला आहे. आता गौर-गणपतींच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील ६ लाख २० हजार ६५० लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा वाटप करण्यात येणार आहे.

जिल्हा पुरवठा अधिकारी संजय गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील रेशन दुकानांत ‘आनंदाचा शिधा’ पोचला असून, त्याचे वितरण सुरू झाले आहे. आनंदाच्या शिध्यात प्रत्येकी एक किलो रवा, चणाडाळ, साखर, खाद्यतेलचा समावेश आहे. जिल्ह्यात सहा लाखांवर रेशन कार्डधारक लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा मिळणार आहे. दरम्यान, संबंधित पुरवठादारांकडून शिधापाकिटांचा पुरवठा झालेला आहे.

आनंदाचा शिधा वाटपाच्या पिशवीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार अशा तिघांचे फोटो असून, वरच्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही फोटो आहे. तर, खालच्या भागात ‘गणेश चतुर्थीनिमित्त आनंदाचा शिधा’ असे लिहून त्याखाली अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांचे नाव आहे.

तालुकानिहाय लाभार्थी

जळगाव ७८,३६३
यावल ४०,८६१
एरंडोल २५,२३९
धरणगाव २९,४४४
पारोळा ३०,४७८
अमळनेर ५०,७८६
जामनेर ४८,९६४
भुसावळ ३९,५३७
मुक्ताईनगर १६,३६६
कुऱ्हा ११,४०४
बोदवड १५,२७३
रावेर ३५,६७८
चोपडा ४६,५०१
पाचोरा ४६,०१९
भडगाव २६,५०४
चाळीसगाव ६१,११३

एकूण ६ लाख २० हजार ६५०