जागतिक महिला दिनानिमित्त ५५ महिलांची मोफत हिमोग्लोबिन व रक्‍तगट तपासणी

मार्च 11, 2024 4:44 PM

डॉ. वर्षा पाटील वुमेंन्स कॉलेज ऑफ होम सायन्सचा उपक्रम

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मार्च २०२४ । जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दि ८ मार्च रोजी डॉ. वर्षा पाटील वुमेंन्स कॉलेज ऑफ होम सायन्स आणि इंडियन रेडक्रॉस सोसा सयुक्‍त विदयमाने विदयार्थी व कुटुंबातील व्यक्‍ती तसेच परिसरातील नागरिकांसाठी मोफत रक्‍तगट व हिमोग्लोबिन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

Free hemoglobin and blood group test jpg webp

तहसिल कचेरी बळीराम पेठ येथे डॉ. वर्षा पाटील वुमेंन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयाच्या परिसरात दु २ ते ३ यावेळेत हे शिबिर आयोजित केले होते यात ५५ महिलांची मोफत हिमोग्लोबिन व रक्‍तगट तपासणी करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाइी प्राचार्य उज्वला मावळे आणि इंडियन रेडक्रॉस सोसाच्या उज्वला वर्मा यांच्या मार्गदर्शनानुसार परिश्रम घेण्यात आले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now