जळगाव जिल्हा
जागतिक महिला दिनानिमित्त ५५ महिलांची मोफत हिमोग्लोबिन व रक्तगट तपासणी
डॉ. वर्षा पाटील वुमेंन्स कॉलेज ऑफ होम सायन्सचा उपक्रम
जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मार्च २०२४ । जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दि ८ मार्च रोजी डॉ. वर्षा पाटील वुमेंन्स कॉलेज ऑफ होम सायन्स आणि इंडियन रेडक्रॉस सोसा सयुक्त विदयमाने विदयार्थी व कुटुंबातील व्यक्ती तसेच परिसरातील नागरिकांसाठी मोफत रक्तगट व हिमोग्लोबिन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
तहसिल कचेरी बळीराम पेठ येथे डॉ. वर्षा पाटील वुमेंन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयाच्या परिसरात दु २ ते ३ यावेळेत हे शिबिर आयोजित केले होते यात ५५ महिलांची मोफत हिमोग्लोबिन व रक्तगट तपासणी करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाइी प्राचार्य उज्वला मावळे आणि इंडियन रेडक्रॉस सोसाच्या उज्वला वर्मा यांच्या मार्गदर्शनानुसार परिश्रम घेण्यात आले.