⁠ 
गुरूवार, डिसेंबर 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

विवाहपूर्व‎ आरोग्य तपासणी करण्याचे आवाहन ‎

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ एप्रिल २०२२ । ‎ अनेकांना दुर्धर व‎ अनुवांशिक आजार असतात हेच‎ माहित नसते, त्यामुळे विवाहपूर्व‎ आरोग्य तपासणी करण्याचे‎ महत्वपूर्ण आवाहन महाराष्ट्र‎ अंधश्रद्धा निर्मूलन समितीने शासकीय वैद्यकीय‎ महाविद्यालय व रुग्णालय यांच्या‎ संयुक्त विद्यमाने केले आहे.

विवाहपूर्व आरोग्य तपासणी करून‎ घेणे महत्वाचे‎ आहे. विवाहपूर्व आरोग्य तपासणीत‎ सिकलसेल, थॅलेसेमिया,‎ एचआयव्ही, हिपॅटायटिस बी या‎ तपासण्या सरकारी फी मध्ये‎ नाममात्र दरात केल्या जाणार आहे.‎ यासाठी शासकीय वैद्यकीय‎ महाविद्यालय व रुग्णालयाचे‎ अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद‎ यांनी अनुकूलता दर्शवली आहे.‎ ओपीडी काळात सकाळी ९ ते १ या‎ वेळेत विवाहपूर्व आरोग्य तपासणी‎ करून मिळणार आहे. याकरिता‎ रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.‎ विजय गायकवाड, उप वैद्यकीय‎ अधीक्षक डॉ.याेगीता बावस्कर‎ सहकार्य करीत आहे.‎