डॉ.उल्हास पाटील हॉस्पिटलमध्ये तिरळेपणासाठी मोफत भव्य शस्त्रक्रिया शिबीर

मार्च 31, 2026 4:12 PM

१ व २ तपासणी ३ ते ५ एप्रिल शस्त्रक्रिया, २० तज्ज्ञ डॉक्टरांची टीम जळगावात

जळगाव लाईव्ह न्यूज । तिरळेपणा आणि पडलेल्या पापणीची मोफत तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरास आजपासून जळगावच्या डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय रूग्णालयात सूरूवात होत असून आज व उद्या तपासणी डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय रूग्णालयाच्या तंज्ञामार्फत केली जाणार असून तर ३ ते ५ शस्त्रक्रिया पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठान पुण्याचे प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ. मधुसूदन झंवर; २० तज्ज्ञ डॉक्टरांची टीम मार्फत केल्या जाणार आहे. यासाठी प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ. मधुसूदन झंवर; २० तज्ज्ञ डॉक्टरांची टीम ३ एप्रिल रोजी जळगावात दाखल होणार आहे.

Free grand surgery

तिरळेपणा या डोळ्यांच्या आजारावर उपचारासाठी मुंबई-पुण्यासारख्या शहरात जाण्याची गरज आता राहिलेली नाही. जळगावातच तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचाराची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. जळगाव खुर्द येथील डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालय येथे दि. ३, ४ आणि ५ एप्रिल रोजी तिरळेपणा व पडलेली पापणी यासाठी मोफत तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर आजपासून सूरू होत असून या शिबिरासाठी पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठान पुण्याचे प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉ.मधुसूदन झंवर हे स्वता शस्त्रक्रिया करणार आहे.

या विशेष शिबिरात डॉ. झंवर यांच्यासोबत २० तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपस्थित राहणार आहे. डॉ. झंवर यांना तिरळेपणा शस्त्रक्रियेचा तीन दशकांहून अधिक अनुभव असून ग्रामीण व शहरी भागातील रुग्णांसाठी त्यांनी १९८ नेत्रशिबिरे यशस्वीपणे आयोजित केली आहेत. या विशेष शिबिरात डॉ. झंवर यांच्यासोबत २० तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपस्थित राहणार आहे. या टीमची लिम्का गु्रप ऑफ रेकॉर्ड सह आतंरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली आहे. तिरळेपणा तसेच पडलेल्या पापणीच्या रुग्णांची तपासणी करून गरजेनुसार शस्त्रक्रिया केली जाणार आहे.तिरळेपणा मुक्त जळगाव जिल्हा हा उद्देश ठेवून हे शिबिर आयोजित करण्यात आले असून जळगाव व परिसरातील रुग्णांसाठी ही मोठी संधी मानली जात आहे. बाहेरगावातील रूग्ण व नातेवाईकांसाठी राहण्याची व जेवणाची व्यवस्था आयोजकांतर्फे करण्यात येणार असून फक्त १०० रुग्णांसाठी मर्यादित नोंदणी ठेवण्यात आली होती परंतू आजपर्यत १२५ च्या वर रूग्णांनी नोंदणी केली असून आजही इच्छुक त्वरित नोंदणी करू शकणार आहे तरी जास्तीत जास्त रूग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क ७०२८३०३४२३ / ९१७५८ ३००७५

जळगावकरांची सेवा करण्याची संधी हे आमचे भाग्य — पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठान पुणे
२६ जिल्हयात १९८ शिबिरे यशस्वीपणे पार पडली असली तरी जळगावबददल विशेष आकर्षण वाटत होते. डॉ.उल्हास पाटील रूग्णालयाने जळगावकरांची सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली हे आमच्या टीमचे भाग्य असल्याचे डॉ. झंवर यांनी सांगितले. पुढे बोलतांना आम्ही देखिल जळगावकरांच्या सेवेसाठी उत्सुक असल्याचे सांगितले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now