⁠ 
शनिवार, जुलै 27, 2024

तलाठी परीक्षेसाठी आजपासून तीन दिवस मोफत प्रशिक्षण

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जून २०२३ । नुकत्याच शासनातर्फे राज्यभरातील तलाठी पदाच्या 4644 जागा जाहीर करण्यात आलेले आहेत. यासह आयबीपीएस आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस च्या माध्यमातून शेकडो पदांसाठी परीक्षा घेतल्या जाणार आहेत. यासंदर्भात जळगाव येथे नोबेल फाउंडेशन संचलित यशवर्धिनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र तर्फे आज दिनांक 28 जून ते 30 जून तीन दिवस मोफत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

सदर प्रशिक्षण वर्ग सकाळी साडेदहा वाजता आय एम आर महाविद्यालयाच्या समोर जिल्हा उद्योग केंद्राच्या मागे नोबेल फाउंडेशनच्या सभागृहात संपन्न होणार आहे. तलाठी परीक्षेच्या संपूर्ण प्रशिक्षणासाठी नोबेल फाउंडेशन तर्फे सैन्य दलात तसेच शेतकरी परिवारातील पाल्यांना प्रशिक्षणामध्ये सवलत दिली जाणार आहे.

याप्रसंगी परीक्षांची तयारी कशी करावी?,अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती ,यासह विविध विषयांवर संचालक जयदीप पाटील,राज्यकर निरीक्षक राहुल पाटील, देवलसिंग पाटील ,अमरसिंग राजपूत, योगेश पाटील मार्गदर्शन करणार आहेत. तरी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे संचालक राजेंद्र पाटील यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 7218501444 या क्रमांकावर संपर्क साधावा.