गुन्हेजळगाव शहर

तरुणाची फसवणूक करणारा संशयित जेरबंद

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जून २०२२ । चहाचा व्यवसाय करण्याच्या नावाखाली ३ लाखाची फसवणूक केल्याच्या दाखल गुन्ह्यातील पसार संशयिताला सायबर पोलीसांनी गुवाहाटी येथून अटक केली आहे. पप्पू खान पीर खान उर्फ साबीर खान उर्फ तौसिफ खान मूळ रा. राजस्थान ह. मु. गुवाहाटी, आसाम असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

शहरातील शेरा चौकातील शेख अहमद हुसेन गुलाम हुसेन (वय-४८) याने फेसबुकवर पीअरल टी कॉफी शाप नावाचे पेजच्या माध्यमातून तरुणाला चहाचा व्यवसाय करण्याच्या नावाखाली शेख अहमद यांची ३ लाख ८०५ रुपयात ऑनलाईन फसवणुक केली होती. तसेच चहाची ऑर्डरसह फोन पे यासह ऑनलाईन पद्धतीने ऍडव्हान्स रक्कम घेवून त्यांनी चहाचा माल पाठविला नव्हता. फसवणुक झाल्याची खात्री झाली. याप्रकरणी त्यांनी सायबर पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार साबीर खान, पप्पू खान, तौसिफ खान यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सायबर पोलिसांनी शेख अहमद हुसेन गुलाम हुसेन यांनी पैसे पाठविलेल्या बँक खाते व संपर्क केलेल्या मोबाईलची संपुर्ण माहिती काढली. त्या माहितीचे पोना दिलीप चिंचोले, गौरव पाटील, दीपक सोनवणे यांनी तांत्रिक विश्‍लेषण करुन संशयिताला जेरबंद केले.

Related Articles

Back to top button