⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

फसवणूक : तरुणांना नोकरीचे आमीष देत २८ लाखांचा गंडा!

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑगस्ट २०२२ । रेल्वे गैंगमन, टिसी, तसेच म्हाडा मुंबई, फॉरेस्ट विभागात शिपाई अशा ठिकाणी नौकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणांना तब्बल २८ लाखांत गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुषण शरद पाटील (रा. खाजोळा ता. पाचोरा), असे संशयित आरोपीचे नाव आहे. या संदर्भात पाचोरा पोलिसात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आला आहेत. पहिली फिर्याद कैलास अशोक पाटील (वय ४१, धंदा : शेती व पानटपरी रा. तारखेडा ता.पाचोरा) यांनी दिली आहे. त्यात म्हटले आहे की, भुषण पाटील याने रेल्वे गैंगमन, टिसी, तसेच म्हाडा मुंबई, फॉरेस्ट विभागात शिपाई म्हणून प्रत्येकी १० लाख रुपये देऊन सरकारी नोकरीचे काम करुन देतो. त्यानुसार कैलास पाटील आणि काही तरुणांनी दिनांक ७ जानेवारी २०२० ते २० जून २०२२ दरम्यान वेळोवेळी फोन पे, गुगल पे, NEFT, RTGS व रोख असे २४ लाख ३८ हजार ५०० दिले. परंतू भूषण पाटील याने दोघांना नौकरी लावली किंवा पैसेही परत दिले नाहीत. याप्रकरणी पाचोरा पोलिसात शरद पाटील विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स.फौ. प्रकाश पाटील हे करीत आहेत.

तर दुसरी फिर्याद ही छायाबाई दिलीप पाटील (वय ५२, व्यवसाय शेती रा.चिंचखेडा ता.पाचोरा) यांनी दिली आहे. त्यात म्हटले आहे की, भूषण शरद पाटील याने मुलाला नौकरी लावून देण्याच्या बहाण्याने वेळोवेळी ४ चार रुपये उकळले. याप्रकरणी देखील गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकाँ भगवान चौधरी हे करीत आहेत.