---Advertisement---
गुन्हे जळगाव जिल्हा

जळगावच्या बांधकाम व्यावसायिकाची तब्बल 1.15 कोटी रुपयांची फसवणूक, अशी झाली फसवणूक

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । फसवणुकीचा एक धक्कादायक प्रकार जळगावातून समोर आला आहे. ज्यात मनपा हद्दीतील जुन्या घराची सौदा पावती करून तब्बल १.१५ कोटी रुपये घेऊन ताबा न देता बांधकाम व्यावसायिकाला ठार मारण्याची धमकी देऊन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

fraud jpg webp

सुनील मधुकर चौधरी (रा. चिंतामणी मोरया नगर, धरणगाव) हे बांधकाम व्यावसायिक असून ते जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार करतात. गोलाणी मार्केट शेजारी भिरुड यांच्या घरी १५ मे २०२३ रोजी जुने बांधीव घराची (सिटी सव्र्व्हे नं २११२/६०) सौदा पावती झाली. त्यापोटी चौधरी यांच्याकडून १ कोटी १५ हजारांची रक्कम घेऊन घराचा ताबा न देता जीवे मारण्याची धमकी देऊन फसवणूक केली, अशी तक्रार चौधरींनी पोलिसांत दिली आहे. याप्रकरणी सुनील चौधरी यांनी फसवणूक झाल्याने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

---Advertisement---

यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
मनोज लीलाधर वाणी, कल्पना मनोज वाणी (दोन्ही रा. मनोकल्प जि. प. कॉलनी), शैलेंद्र भिरुड, हेमलता उर्फ तनुजा शैलेंद्र भिरुड (दोन्ही रा. महाबळ कॉलनी), तिलोत्तमा दीपक इंगळे, दीपक पीतांबर इंगळे, (दोन्ही रा. मामलदे), संदीप रामभाऊ पाटील (रा. श्रीकृष्ण कॉलनी, जळगाव), राजेंद्र गोपाळ सावदेकर, (रा. आसोदा), शेखर भास्कर भिरुड, नरेंद्र दत्तात्रय भिरुड, ज्ञानेश्वर दत्तात्रय भिरुड, गौरव कृष्णा भिरुड (रा. हेमल, महाबळ कॉलनी).

या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक (सपोनि) शीतलकुमार नाईक करीत आहेत. मोठ्या आर्थिक फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस आल्यानंतर व्यवसायिक आणि गुंतवणूकदारांमध्ये खळबळ माजली आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---