⁠ 
गुरूवार, नोव्हेंबर 14, 2024
Home | गुन्हे | Jalgaon : गॅस स्फोटातील चौथ्या जखमी तरुणाचा मृत्यू

Jalgaon : गॅस स्फोटातील चौथ्या जखमी तरुणाचा मृत्यू

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील इच्छादेवी पोलिस चौकीलगत झालेल्या गॅस स्फोटात जखमी झालेल्या आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. यामुळे या दुर्घटनेतील मृतांची संख्या चार झाली आहे. सूरज दालवाले (वय २४) असे मृत्यू झालेल्या जखमी तरुणाचे नाव आहे .

गेल्या मंगळवारी जळगाव व सूरज दालवाले नाशिक येथील दालवाले कुटुंबीय अमळनेर येथील मंगळ ग्रह मंदिरावर धार्मिक कार्यक्रमाला भाड्याने घेतलेल्या व्हॅनने निघाले होते. याच दरम्यान इच्छादेवी पोलिस चौकीलगत व्हॅनमध्ये अवैध गॅस भरताना स्फोट झाला होता. यात ११ जण भाजले गेले. त्यात दालवाले कुटुंबातील सात जणांसह व्हॅन चालक, गॅस सेंटर चालक, शेजारील पंक्चर दुकानदार व धुळे येथील पोलिस कर्मचारी यांचा समावेश होता.

रविवारपर्यंत गॅस सेंटर चालक दानिश, भरत दालवाले व व्हॅन चालक संदीप शेजवळ या तिघांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी जीएमसीत उपचार सुरू असलेला तरुण सूरज दालवाले याच्या हृदयाचे ठोके मंदावले होते. म्हणून त्याला सायंकाळी व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. अखेर रात्री साडेआठ वाजता त्याचा मृत्यू झाला. उर्वरित तीन जखमींची प्रकृतीही गंभीर झाली आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.