जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना वाढताना दिसत असून अशातच अमळनेरच्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणात अमळनेर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

नेमका प्रकार काय?
अमळनेर शहरात कुटुंबियांसोबत वास्तव्यास असलेल्या १४ वर्षीय मुलीला मंगळवार १२ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजता संशयित आरोपी अन्नू नारायण साळुंखे (पारधी, रा. अमळनेर) याने फोन करून भेटण्यास बोलविले. त्यानंतर त्याने तिला दुचाकीवर बसवून चोपडा रोडवरील एका मंदिराच्या परिसरात असलेल्या मोकळ्या जागेत जाऊन तिच्यावर जबरी अत्याचार केला. या घटनेसाठी संशयित आरोपीला गण्या उर्फ गणेश नाना साळुंखे (पारधी) याने सहकार्य केले.

दरम्यान हा प्रकार घरी आल्यानंतर पिढीने नातेवाईकांना सांगितला. त्यानुसार नातेवाईकांसह तिने अमळनेर पोलिसात धाव घेऊन दोघांनी विरोधात फिर्याद दिली. पीडित मुलीच्या फिर्यादीवरून बुधवारी १३ ऑगस्ट रोजी रात्री संशयित आरोपी अन्नू साळुंखे आणि गण्या साळुंखे या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. या घटनेचा पुढीलचा पास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करीत आहे.












