जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ ! एकाच रात्रीत चार दुकाने फोडली

ऑगस्ट 6, 2025 1:36 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरात चोरट्यांनी घातलेला धुमाकूळ काही कमी होताना दिसत नाहीय. शहरात सातत्याने घरफोडीच्या घटना समोर येत आहे. एकंदरीत चोरट्यांना खाकीचा धाकच शिल्लक नसल्याचं दिसून येतेय. अशातच शहरातील न्यू बीजे मार्केटमधील चार दुकान चोरट्यांनी फोडली. यामुळे दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण असून याबाबत जिल्हापेठ पोलिस ठाण्यात सोमवारी घरफोडीच्या गुन्ह्याची नोंद झाली.

chalisgaon gharfodi 44 thousand

गिरीश विजय सैंदाणे (रा. स्टेट बैंक कॉलनी, महाबळ) यांचे न्यू बी. जे. मार्केटमध्ये असलेले विजय पान हाऊस हे दुकान फोडून चोरट्यांनी चिल्लर व रोकड असे १५०० रुपये लंपास केले. तसेच सुनील बारी यांच्या याच मार्केटमधील नयन प्रिंट्स या दुकानाचे शेटर वाकवून साडेचार हजारांची रोकड लंपास केली.

दोन दुकानातून चिल्लर व रोकड लंपास केल्यानंतर लक्ष्मी अॅक्रेलिक व शुभम ग्राफीक्स या दुकानाचे शटर उघडण्याचा प्रयत्न केला. त्यात शटर न उघडल्याने नुकसान झाले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now