⁠ 
शुक्रवार, सप्टेंबर 20, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | कोरोना नियम पाळत नसल्यामुळे जळगाव शहरात चार दुकाने सील

कोरोना नियम पाळत नसल्यामुळे जळगाव शहरात चार दुकाने सील

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ एप्रिल २०२१ । शहरात कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून मनपा प्रशासनाकडून नियम मोडणाऱ्यांना धडक कारवाई केली जात आहे सोमवारी उपायुक्त संतोष वावळे यांच्यासह अधिक्रमण पथकाने शहरात फिरून चार दुकाने सील केले तसेच मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली.

जळगाव शहरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असतानाही नागरिकांकडून नियमांचे पालन केले जात नाही. जळगाव शहर मनपाकडून धडक कारवाई केली जात असून दोन दिवसापूर्वी ५ दुकाने सील केल्यानंतर सोमवारी पुन्हा ४ दुकाने सील करण्यात आली. अतिक्रमण पथकाच्या कारवाईने काहीसा वचक निर्माण होत असला तरी नियम मोडणारे मात्र कायम आहेत.

author avatar
Tushar Bhambare