⁠ 
रविवार, जानेवारी 12, 2025
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | भुसावळ-पुणे मार्गावर मेमू गाडीच्या चार फेऱ्या

भुसावळ-पुणे मार्गावर मेमू गाडीच्या चार फेऱ्या

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ०७ एप्रिल २०२१ । रेल्वे प्रशासन विशेष बाब म्हणून एप्रिल महिन्यात पुणे-भुसावळ ही विशेष मेमू गाडी चालवणार आहे. संपूर्ण आरक्षित असलेली ही गाडी मनमाड, दाैंड काॅर्ड लाईन मार्गाने चालवण्यात येईल.

भुसावळ-पुणे ही विशेष मेमू गाडी (क्रमांक ०११२१) गुरुवारी (दि. १५ व २९ एप्रिल) या दिवशी भुसावळ जंक्शनवरून सकाळी ६.१५ वाजता सुटेल. ती दुपारी ४.४५ वाजता पुण्याला पाेहोचेल. तर परतीच्या मार्गावर पुणे – भुसावळ (क्रमांक ०११२२) विशेष गाडी १६ व ३० एप्रिल या दिवशी चालवली जाणार  आहे. ही गाडी पुण्यातून सकाळी ११.३० वाजता सुटून ८.४५ वाजता भुसावळात येईल. या गाडीच्या एकुण चार फेऱ्या होतील.

या स्टेशनाला मिळणार थांबा

उरळी, दाैड काॅर्ड लाईन, नगर, बेलापूर, काेपरगाव, मनमाड, चाळीसगाव, जळगाव आणि भुसावळ येथे गाडीला थांबा आहे. दरम्यान, भुसावळ-पुणे मेमू गाडीला एकुण ८ डबे असतील. हे सर्व डबे आरक्षित असल्याने केवळ कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांना त्यातून प्रवास करता येणार  आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.