जळगाव जिल्हामुक्ताईनगर

‘त्या’ हल्ल्यातील संशयितांच्या शोधासाठी पोलिसांची चार पथक रवाना

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० डिसेंबर २०२१ । जिल्हा सहकारी बँकेच्या माजी अध्यक्षा ऍड. रोहिणी खडसे खेवलकर यांच्या वाहनावर सोमवारी रात्री झालेल्या हल्लाप्रकरणी स्थानिक पोलिसांचे तीन तर गुन्हे अन्वेषण शाखेचे एक अशी चार पथके आरोपींच्या शोधासाठी वेगवेळ्या ठिकाणी रवाना झाली आहेत.

ऍड. रोहिणी खडसे खेवलकर यांच्या वाहनावर सोमवारी रात्री चांगदेव-कोथळी दरम्यान, मानेगाव फाट्यालगत हल्ला झाला होता. याप्रकरणी शिवसेनेच्या तीन पदाधिकाऱ्यांसह इतर चार अनोळखी अशा सात जणांविरुद्ध मंगळवारी मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

शिवसेना पदाधिकाऱ्यांचा समावेश

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये मुक्ताईनगर शिवसेनेचे विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील पाटील, तालुकाप्रमुख छोटू भोई आणि चांगदेव ग्रा.पं. सदस्य पंकज कोळी यांचा समावेश आहे.

दरम्यान पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित आरोपींच्या शोधासाठी स्थानिक पोलिसांचे तीन तर गुन्हे अन्वेषण शाखेचे एक पथक रवाना झाले आहे. संशयितांचा कसून शोध घेतला जात आहे.

हे देखील वाचा :

    Related Articles

    Back to top button