जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मार्च २०२१ । जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. धरणगाव मध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असतानाच त्यात विविध आजारांची साथ देखील सुरू आहे. सर्दी व खोकला संदर्भात औषध साठा शिल्लक नसल्याने औषधी रुग्णांना मिळत नाहीत. असे असताना बुधवारी धरणगाव ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन अभावी चार रुग्णांचा मृत्यू झाला.
या ठिकाणी दहा ऑक्सिजन बेड असून रुग्ण संख्या ३० ते ३५ रुग्ण उपचार घेत आहेत. उपचार घेत असताना चार रुग्णांचा मृत्यू झाला. याठिकाणी उपचार घेत असलेले रुग्ण एक खर्दे येथील तर तीन धरणगावातील रुग्ण आहेत यांचे वय ५५ ते ६५ वर्षे यादरम्यान आहे. धरणगाव तालुक्यात एकूण ८९ खेडे धरणगावला लागून आहेत. रुग्णाची गैरसोयदेखील या ठिकाणी होत असते.
जिल्हा सामान्य रुग्णालयापासून बत्तीस किलोमीटर असून धरणगाव तालुका उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी होत आहे. याठिकाणी रूग्णालयात एक्स-रे मशीन, जनरेटर सोनोग्राफी सेंटर अशा विविध प्रकारे आवश्यक रूग्णालयाला लागणारे साधने नाहीत. तसेच अनेक पदे देखील रिक्त आहेत. लवकरात लवकर सोयीसुविधा उपलब्ध करून द्यावेत व उपजिल्हा रुग्णालय व्हावे, अशी मागणी नागरिकांकडून वारंवार होते.