---Advertisement---
गुन्हे चोपडा

अवैद्य शस्त्र विक्री करणाऱ्या चौघांना अटक, ३७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑगस्ट २०२२ । चोपडा -शिरपूर रस्त्यावरील एस्सार कंपनीच्या पेट्रोल पंपाजवळ अवैद्य शस्त्र खरेदी विक्री करताना तब्बल चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून ६ गावठी बनावटीचे कट्टे, ३० जिवंत काडतूस, ४ मोबाईल फोन व फोर्ड एंडेवेअर कंपनीचे चार चाकी वाहन असा एकूण रु. ३७,३७००० किमंतीच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime bhusaval jpg webp

चोपडा ते शिरपुर रोडवर एस्सार पेट्रोलपंपाजवळ दि.17 रोजी रात्री ९.३० वा. सुमारास आरोपी नामे 1) गणेश उर्फ सनी सुनिल शिंदे वय 25 रा. ओगलेवाडी ता. कराड जि.सातारा 2) मोहसीन हनिफ मुजावर वय 30 रा.युवराज पाटील चौक, मसुर ता.कराड जि. सातारा 3) रिजवान रज्जाक नदाफ वय 23 रा. शिवाजी चौक, मलकापुर ता. कराड. जि. सातारा व 4) अक्षय दिलीप पाटील वय 28 रा.45 रविवार पेठ, कराड जि.सातारा अशांनी अवैद्य शस्त्र खरेदी विक्री करणारा आरोपी नामे सुरज विष्णु सांळुखे रा.कराड जि.सातारा याचे सांगण्यावरुन आरोपी नामे सागर सरदार पुर्ण नांव माहिती नाही (शिखलकर) रा. पारउमर्टी ता.वरला जि.बडवानी याच्या जवळून 6 गावठी बनावटीचे पिस्टल (कट्टा) मॅग्झीनसह तसेच 30 पिवळया धातुचे जिवंत काडतुस हे विनापरवाना व बेकायदेशीर रित्या स्वताच्या कब्ज्यात बाळगून कोणास तरी विक्री करण्याच्या उद्देशाने आढळून आल्याने चारही जणांना ताब्यात घेण्यात आले.

---Advertisement---

त्याचे ताब्यातील 1,20,000 रुपये किंमतीचे 6 गावठी कट्टे, 30,000 रुपये किंमतीचे 30 जिंवत काडतूस, 87000/- रुपये किमंतीचे 4 मोबाईल फोन व 35,00,000/- रुपये किमंतीची फोर्ड एन्डेव्हर कपंनीचे वाहन क्रंमाक MH 50 L 8181 या चार चाकी वाहनासह 37,37000/- किमंतीच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. व 6 ही आरोपी हे संगनमताने गुन्हा करतांना मिळुन आल्याने चोपडा शहर पोस्टे. भाग 5 गुरनं. 336/2022 भादंवि कलम 34 प्रमाणे आर्म अॕक्ट 3/25, 7/25 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, सहा.पोलीस अधीक्षक चोपडा विभाग कृषीकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरिक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पोहेकाँ. दिपक विसावे, पोना. संतोष पारधी, पोना. संदिप भोई, पोकाँ. शुभम पाटील, पोकाँ. प्रमोद पवार व पोकाँ. प्रकाश मथूरे आदिंच्या पथकाने केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक अजित सावळे हे करीत आहेत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---