जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । माजी खासदार जावळे यांचे चिरंजीव अमोल जावळे हे पक्षा पातळीवर सक्रीय झाले. सामन्य कार्यकर्त्या प्रमाणे आपण आमागी जिल्हा परिषद, पंचायत समितीसह विविध निवडणूकीत सक्रीय राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली. नुकतेच केंद्रीय मंत्री दावने यांची भेट घेतली. दरम्यान पारिवारिक, सामाजिक आणि शेतकऱ्यांच्या विषयांवर चर्चा केली.

यात प्रामुख्याने केळी उत्पादक शेतकऱ्याच्या अडचणी, केळी मजूर संर्दभातील समस्या, केळी वैगन, मेगा रिचार्ज प्रकल्प या बाबत सखोल चर्चा केली. या प्रसंगी आमदार संतोष दानवे हे देखील होते. ही भेट अमोल जावळे यांच्या राजकीय प्रवासातील मार्गदर्शक भेट म्हणुन सद्या जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे.

केळी साठी रेल्वे वॅगेन बाबत चर्चा
जिल्ह्यात प्रामुख्याने रावेर, यावल येथील शेतकऱ्यांच्या केळी उत्तर भारतात नेण्या कामी रेल्वेकडून वेळेवर वॅगन उपलब्ध व्हावी, या विषया सह मेगा रिर्चाज प्रकल्पाच्या पुढील टप्प्यातील हालचाली बाबत चर्चा करण्यात आली. असे अमोल जावळे यांनी सांगीतले.







