पुन्हा यावल वनविभागाची धडक कारवाई : सागवान लाकूड जप्त
जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । यावल वनविभागाची पुन्हा धडक कारवाई बऱ्हाणपूर अंकलेश्वर राज्य मार्गावर विनापरवाना सागवान लाकडाची वाहतूक होत असल्याचे निदर्शनाकस आले असता.यावर कारवाई करीत ८ हजार रुपये किमतीचे सागवान लागूड जप्त केले आहे. या प्रकरणी यावल पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे.
सविस्तर असे की,बऱ्हाणपुर-अंकलेश्वर या राज्यमार्गावरील मश्जिद परिसरात विना परवाना सागवान लाकडाची वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती यावल वनविभागाच्या पथकाला १६ डिसेंबर रोजी सायंकाळी मिळाली होती. त्यानुसार वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक पि.व्हि.हाडपे यांच्चा सह यावल पश्चिम वनक्षेत्रातील पथकातील वनपाल,वनसंरक्षक, पोलीस नाईक, वाहनचालक यांनी धडक कारवाई करत सायंकाळी ७ वाजेच्चा सुमारास विनापरवाना वाहतूक होत असलेल्या ८ हजार रुपये किंमतीचे सागवान जातीचे लाकूड ९ नग १३० घनमीटर जप्त करण्यात आले. याप्रकरणी यावल पोलीस स्थानकात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील चौकशी वनविभाचे उपवनसंरक्षक पी.व्ही. हाडपे,यावलचे पूर्व विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विक्रम पदमोर यांच्चा मार्गदर्शनाखाली डोंगरकठोरा विभागाचे वनपाल करीत आहे.