जिल्हा बँकेसाठी इच्छुकांची भाऊ गर्दी.. पहा कोणत्या दिग्गजांनी भरले अर्ज
जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑक्टोबर २०२१ । जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा शेवटच्या दिवशी राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे, आ. गिरीश महाजन यांच्यासह अनेक दिग्गजानी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. शेवटच्या दिवशी १७४ उमेदवारी अर्ज दाखल झाले.
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (जेडीसीसी) निवडणूक प्रक्रियेला वेग आला आहे. बुधवार दि.१३ पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली होती. दरम्यान, सोमवार दि.१८ रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस होता. दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत होती. त्यानुसार शेवटच्या दिवशी १७४ उमेदवारी अर्ज दाखल झाले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राष्टवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे, आमदार गिरीश महाजन, बँकेच्या अध्यक्षा ऍड. रोहिणी खडसे, खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेष पाटील, आमदार संजय सावकारे, आमदार सुरेश भोळे, आमदार मंगेश चव्हाण, माजी आ. स्मिता वाघ, महापौर जयश्री महाजन, शामकांत बळीराम सोनवणे आदी दिग्गजांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.