जळगाव लाईव्ह न्यूज । ५ एप्रिल २०२२ । चोपडा तालुक्यातील उनपदेव तीर्थक्षेत्रावरील विकास कामांसाठी चार कोटी ९७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यातून उनपदेव तीर्थावरील मंदिरे, स्नानकुंड, इमारतींचे नूतनीकरण, निसर्ग परिचर केंद्र, नावीन्यपूर्ण पॅगोडेसह सेल्फी पॉईंट अशा सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. तसेच येथील मिनी रेल्वे ट्रॅक नूतनीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे आगामी काळात मिनी रेल्वे पर्यटकांसाठी सुरू होणार आहे.
आमदार लता सोनवणे, माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या पाठपुराव्याने पर्यटन विकास व सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या माध्यमातून विविध विकासकामे मंजूर करण्यात आली आहेत. राज्याचे पर्यटन व सांस्कृतिक मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे त्यांनी पाठपुरावा केला. पर्यटकांसाठी नावीन्यपूर्ण पॅगोडे तयार केले जाणार आहेत. तसेच निसर्ग परिचर केंद्राचे नूतनीकरण, सौर रोषणाई, रंगरंगोटी, पर्यटकांसाठी पाण्याची टाकी, सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार अाहेत. तसेच सातपुड्यातील आदिवासींची जीवनशैली, सांस्कृतिक परंपरांचे दर्शन घडविणारे संग्रहालय होईल.