मुक्ताई मंदिरावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी

मार्च 9, 2024 4:19 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मार्च २०२४ । महाशिवरात्री निमित्ताने राष्ट्रवादी कॉग्रेस शरद पवार महिला गटाच्या प्रदेशाध्यक्षा ॲड रोहिणी खडसे यांच्या तर्फे सिध्देश्वर चांगदेव मंदिर व श्रीक्षेत्र मेहूण मुक्ताई मंदिरावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली.

Muktai temple jpg webp

आदिशक्ति मुक्ताईची दिंडी शिष्य चांगदेव महाराजांच्या भेटीला येऊन गुरु शिष्याची परंपरा आहे. यावर्षीही गुरुवर्य मुक्ताई व शिष्य चांगदेवांची भेटीचा सोहळ्या निमित्ताने हजारो भाविकांच्या उपस्थितीत आणि टाळ-मृदंगाच्या गजरात अवघे श्रीक्षेत्र चांगदेव दुमदुमले.

सिध्देश्वर चांगदेव महाराजांच्या यात्रोत्सवास शुक्रवार (ता.८) पासून सुरुवात झाली. तीन दिवस चालणाऱ्या यात्रोत्सवात आदिशक्ति मुक्ताईच्या यात्रोत्सवास आलेल्या वारकरी दिंड्यांसह असंख्य भाविक या यात्रेस आलेले आहेत. यात्रेला येणाऱ्या भाविकांनी तापी-पूर्णा संगमावर स्नानाला गर्दी केली. तापी-पूर्णा नद्यांचा संगमावर अथांग जलाशय आणि निसर्ग सौंदर्यामुळे यात्रेकरूनी नौकाविहाराचा आनंद लुटला. जवळपास पंचवीस ते तीस नौका याठिकाणी नौकाविहारानी भाविकांना सेवा दिली.

माजी सरपंच पंकज कोळी, सपत्निक, फोफनारचे सौरभ महाजन यांच्या हस्ते सपत्निक महापूजा व रुद्राभिषेक झाला. दिपक जाधव, जिवराम महाजन, अक्षय चौधरी उदय शेजोळे, मिथुन महाजन आदी उपस्थित होते. यात्रोत्सवासाठी विदर्भ, खान्देश, मराठवाडासह विविध भागातून आलेल्या दिंड्यातील भाविकांसाठी पुजेनंतर मंदीर खुले करण्यात आले

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now