कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय इमारत आवारातील ध्वजारोहण रद्द
जळगाव लाईव्ह न्यूज । ३० एप्रिल २०२१ । महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोना बाधितांची वाढती रुग्ण संख्या विचारात घेऊन कोरोना विषाणुची साखळी तोडण्यासाठी (BREAK THE CHAIN) व सदर विषाणुचा प्रसार रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाने 13 एप्रिल, 2021 च्या आदेशान्व्ये दि. 1 मे, 2021 च्या सकाळी 7.00 वाजेपर्यंत राज्यात संचारबंदीसह कडक निर्बध लागु केलेले आहेत.
कोरोना विषाणुची साखळी तोडण्यासाठीच्या तरतुदी विचारात घेऊन राज्यात महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 61 वा वर्धापन दिन समारंभ गतवर्षी प्रमाणेच, अत्यंत साधेपणाने साजरा करणेबाबत प्राप्त सुचनांच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 61 वा वर्धापनदिन समारंभ 1 मे, 2021 प्रशासकीय इमारत टप्पा क्र-3 च्या प्रांगणात साजरा करण्यात येणार नाही.
तरी प्रशासकीय इमारतीतील अधिकारी, कर्मचारी यांनी ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित राहु नये. असे आवाहन जळगाव वनविभागाचे उप वनसंरक्षक विवेक होशिंग यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.