⁠ 
गुरूवार, सप्टेंबर 12, 2024
Home | गुन्हे | भयंकर! रावेरमध्ये वीज कोसळल्याने पाच जण गंभीर जखमी

भयंकर! रावेरमध्ये वीज कोसळल्याने पाच जण गंभीर जखमी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ सप्टेंबर २०२४ । जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरु असून याच दरम्यान रावेर तालुक्यातून धक्कादायक घटना समोर आलीय. वीज कोसळल्याने शेत परिसरात राहणारे पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना दोधे येथे आज मंगळवारी घडली. या घटनेतील जखमींना तातडीने ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

काय आहे घटना?
रावेर तालुक्यातील दोधे गावात मंगळवारी ३ सप्टेंबर रोजी सकाळी वीज कोसळल्याने गावात राहणारे मीराबाई प्रताप जमरे (वय ३०), पूजा प्रताप जमरे (वय १३), रेखाबाई खरते (वय ३०), कालू खरते (वय ३०) आणि ज्योती चंद्रसिंग रावत (वय ३०) असे पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. हे कुटुंब मूळचे मध्यप्रदेशातील झिरण्या येथील रहिवासी असून, उदरनिर्वाहासाठी रावेर तालुक्यातील दोधे येथे शेतीच्या कामासाठी आले होते. शेतात राहुट्या उभारून ते राहत होते.

प्राथमिक उपचारानंतर जखमींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मध्य प्रदेशातील बुरहानपुर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या दुर्घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण गाव हादरले आहे. स्थानिक प्रशासनाने या घटनेची दखल घेतली असून, नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.