जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ डिसेंबर २०२१ । अवघ्या सहा दिवसांच्या बालिकेस पोलिस ठाण्याबाहेर सोडून आईने पलायन केले. ही मन हेलावणारी घटना गुरुवारी भुसावळात घडली.पोलिसांनी या बालिकेस जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील शिशू विभागात ठेवले आहे.
भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या बाहेर गुरुवारी दुपारी 3 वाजता ही घटना घडली. या पोलीस ठाण्याच्या बाहेर काही भिक्षुकी करणारे लोक बसलेले असतात. दुपारी एका महिलेने या मुलीस त्यातील एका व्यक्तीकडे दिले. काही कळण्याच्या आतच ती महिला तेथून निघून गेली. भिक्षुकी करणाऱ्यांनी तिचा शोध घेतला परंतु मिळून आली नाही. यानंतर त्यांनी बालिकेस पोलीस ठाण्यात नेले. पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांनी पथक पाठवून पुन्हा त्या महिलेचा शोध घेतला.
अखेर सायंकाळी सहा वाजता पोलीस कर्मचारी मीना कोळी, एस. एम. बारी, प्रणय पवार यांनी या बालिकेस शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले. वैद्यकीय तपासणी केली असता बालिका सुदृढ असल्याचे निष्पन्न झाले.
हे देखील वाचा :
- जळगावकरांचे प्रचंड आभारी आहे; “हॅट्ट्रिक” साधून विजयी झाल्यानंतर आ. राजूमामांची प्रतिक्रिया
- जळगाव ग्रामीणमध्ये गुलाबराव पाटीलांचा पुन्हा विजय ; विरोधकांना चारली धूळ
- जळगाव शहरातून राजूमामा भोळे यांची विजयी हॅट्रिक
- महाराष्ट्र्रात पुन्हा महायुतीचे सरकार; ‘या’ 5 मुद्द्यांमुळे मिळाला विजय..
- जळगाव जिल्ह्यात मविआला धोबीपछाड! सर्वच ११ जागांवर महायुतीचा विजय निश्चित