जळगाव लाईव्ह न्यूज । २ नोव्हेंबर २०२३ । जळगाव जिल्ह्यात गंभीर गुन्हेगारांवर कारवाईचे सत्र सुरू असून अशातच जळगाव शहरातील ५ गुन्हेगारांना २ वर्षांकरिता हद्दपार करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी काढले. या कारवाईमुळे जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारींमध्ये खळबळ उडाली आहे
हद्दपार करण्यात आलेल्यांचे नावे
हितेश संतोष शिंदे (वय-२५), संतोष उर्फ जागो रमेश शिंदे (वय-४५), आकाश उर्फ नाकतोड्या संजय मराठे (वय-२२), सुमित उर्फ गोल्या संजय मराठे (वय-२७) आणि संजय देवचंद मराठी (वय-५०) सर्व रा. चौगुले प्लॉट, कांचन नगर, जळगाव असे हद्दपार करण्यात आलेल्यांचे नावे आहेत.
जळगाव शहरातील कांचन नगरात राहणाऱ्या या पाचही जणांच्या टोळीवर खून प्रयत्न करणे, जबरी चोरी, दंगल, घातक हत्यार बाळगणे, मारामारी, शिवीगाळ, दमदाटी तसेच पोलिसांच्या आदेशाची उल्लंघन करणे या स्वरूपाचे वेगवेगळे ७ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे. या अनुषंगाने या टोळीला हद्दपार करण्याबाबत शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी हद्दपार करण्याचा प्रस्ताव प्रस्ताव उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांना पाठवला.
त्यानुसार त्यांनी प्रस्तावाचे अवलोकन करत हद्दपारिला मंजूर देण्यासाठी पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्याकडे पाठवला. दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी शुक्रवारी हद्दपार करण्याचे आदेशाला मंजुरी दिली.यानंतर पाचही गुन्हेगारांना ताब्यात घेऊन २ वर्षांसाठी जिल्हा हद्दपार केले आहे. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकांवर कळविले आहे.