---Advertisement---
गुन्हे यावल

संतापाच्या भरात झाला घात, लाकडी दांड्याने पत्नीचा खून

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ फेब्रुवारी २०२२ । यावल तालुक्यातील थोरगव्हाण गावात राहणाऱ्या एकाने संतापाच्या भरात लाकडी दांड्याने मारहाण करीत पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली आहे. दरम्यान, घटनेनंतर संशयीत पती स्वतःहून पोलिसात हजर झाला असून कौटुंबिक वादातून हा खून झाल्याचे समजते. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

fit of rage stabbed his wife to death with wooden stick

यावल तालुक्यातील थोरगव्हाण येथे इंदूबाई प्रकाश पाटील (वय-५८) या पती प्रकाश पांडूरंग पाटील, विवाहित मुले आनंद आणि मुकेश यांच्यासह वास्तव्याला आहे. इंदूबाई पाटील आणि प्रकाश पाटील यांच्या गेल्या अनेक दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरू होता. रविवार २७ फेब्रुवारी रोजी मुलगा आनंद हा जळगाव येथे कामासाठी गेला होता. तर लहान मुलगा गावातच एका गल्लीत वेगळा राहतो. त्यामुळे घरात प्रकाश पाटील आणि पत्नी इंदूबाई पाटील हे दोन्ही एकटेच होते.

---Advertisement---

सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास पती-पत्नी यांच्या कौटूबिक कारणावरून तीव्र वाद झाला. यात संतापाच्या भरात प्रकाश पाटील यांनी पत्नी इंदूबाई पाटील यांच्या डोक्यात लाकडी दांडका टाकला. यात इंदूबाई पाटील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना शेजारच्यानी तातडीने जळगाव जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ नेण्यात असतांना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. संशयित आरोपी पती प्रकाश पाटील याने खून केल्यानंतर स्वत:हून यावल पोलीस ठाण्यात जमा झाला आहे.

जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह आणण्यात आला असून रात्री उशीरापर्यंत संशयित आरोपी पती प्रकाश पांडूरंग पाटील याच्या विरोधात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. मयत महिलेच्या पश्चात पती, दोन मुले आणि विवाहित मुलगी असा परिवार आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे व पोलीस करीत आहे

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---