---Advertisement---
राष्ट्रीय

सातासमुद्रापार घुमला ढोल, ताशांचा गजर

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ सप्टेंबर २०२३ । गणपती बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर या…या जयघोषात काल गुरुवारी लाडक्या गणरायाचे विसर्जन झाले. यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत ढोल, ताशांचे पथकाबरोबर भव्य दिव्य देखावे भाविकांना पाहण्यास मिळाले. दरम्यान, ढोल, ताशांचा गजर सातासमुद्रापार घुमला आहे.

dhol tasha jpg webp

स्वीडनमध्ये पहिल्यांदा ढोल-ताशा पथकाची सुरुवात झाली आहे. स्वीडनमधील गणेश मंदिरात पहिल्याच परफॉर्मन्सला अत्यंत उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. स्टॉकहोममधील ढोल-ताशा पथकाचे संस्थापक अभिनय सरकटे आहेत आणि गोथेनबर्गमध्ये प्रणाली मानकर यांनी पहिल्यांदा प्रयत्न केले. त्यांनी एकत्रितपणे ‘स्वराज्य ढोल-ताशा पथक’ स्थापन केले आहे.

---Advertisement---

गणेश विसर्जनाच्या उत्सवानिमित्त पथकाने सलग 2 तास धमाकेदार परफॉर्मन्स केला. भाविकांनी त्याला जोरदार प्रतिसाद देत, बाप्पा मोरयाच्या गजरात, ढोल-ताशाच्या तालावर ठेका धरला. स्वीडिश ध्वजाच्या निळ्या आणि पिवळ्या रंगांची छटा असलेल्या आमच्या पथकाच्या खास पेहरावाने स्वीडिश भूमीवर आपल्या भारतीय परंपरेचा सुंदर अनुभव दिला.

परदेशात भारतीय सण-उत्सव परंपरा जपण्याच्या आमच्या प्रयत्नांची आपण आपल्या माध्यमात दखल घेतल्यास, आपल्या समर्थनाने आमचा उत्साह नक्कीच द्विगुणित होईल. धन्यवाद.

  • प्रणाली मानकर
    स्वराज्य ढोल-ताशा पथक, स्वीडन

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---