---Advertisement---
बातम्या

पठाणने KGF 2, RRR ला मागे टाकले ; पहिल्या दिवसाची कमाई किती? आकडा वाचून थक्क व्हाल..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जानेवारी २०२३ । बहुचर्चित ‘पठाण’ (Pathan Movie) हा चित्रपट काल बुधवारी (25 जानेवारी) प्रदर्शित झाला आणि पहिल्याच दिवशी या चित्रपटाने कमाईचे नवे विक्रम रचले आहेत. ‘पठाण’ने पहिल्याच दिवशी जवळपास 54 कोटी रुपयांचा गल्ला जमवल्याची माहिती समोर येत आहे.

pathan movie jpg webp webp

‘पठाण’ने पहिल्या दिवसाच्या कमाईच्या बाबतीत एस. एस. राजामौली यांच्या ‘बाहुबली’ आणि कन्नड सुपरहिट चित्रपट ‘केजीएफ 2’लाही मागे टाकलं आहे. बुधवारी संध्याकाळपर्यंत ‘पठाण’ने 25.05 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. ही कमाई हृतिक रोशनच्या ‘वॉर’पेक्षाही अधिक आहे. प्रदर्शनापूर्वीही ‘पठाण’नेही ॲडव्हान्स बुकिंगचा विक्रम मोडला होता.

---Advertisement---

सुरुवातीपासूनच पठाणबाबत प्रेक्षकांमध्ये क्रेझ पाहायला मिळत होती. या चित्रपटाबाबत अनेक वाद निर्माण झाले होते. विशेषत: दीपिका पदुकोणच्या ‘बिकिनी के रंग’वरून सुरू झालेला वाद हा चित्रपटाच्या रिलीज डेटपर्यंत चर्चेत राहिला. पण, आता शाहरुखचा पठाण रिलीज झाल्यानंतर चाहते चांगलेच खूश आहेत. या चित्रपटाला केवळ प्रेक्षकच नाही तर समीक्षक आणि सेलिब्रिटींकडूनही जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी अनेक मोठे विक्रम केले. एवढेच नाही तर पठाणने बॉक्स ऑफिसवरही धमाकेदार कमाई केली आहे.

हा चित्रपट हिंदीसोबतच तमिळ आणि तेलुगू भाषांमध्येही प्रदर्शित झाला आहे. यशराज फिल्म्स निर्मित या चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदने केलं आहे. यामध्ये शाहरुखसोबतच दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणा यांच्या भूमिका आहेत.

सर्वाधिक ओपनिंग कमाई करणारे बॉलिवूड चित्रपट
वॉर- 53.35 कोटी रुपये
ठग्स ऑफ हिंदोस्तान- 52.25 कोटी रुपये
हॅपी न्यू इअर- 44-97 कोटी रुपये
भारत- 42.30 कोटी रुपये
प्रेम रतन धन पायो- 40.35 कोटी रुपये

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---