⁠ 
मंगळवार, एप्रिल 23, 2024

फातिमानगर येथे गोळीबार झाल्याची घटना; कायद्याचा धाक संपला का?

जळगाव लाईव्ह न्यूज| १० ऑगस्ट २०२३। जळगाव शहरातील एमआयडीसीतील फातिमानगर येथे जुन्या वादातून एकाने हवेत दोन गोळीबार केल्याचे खडबड जनक घटना सकाळी ११ वाजता घडली आहे.

जळगाव शहरातील एमआयडीसीतील व्ही सेक्टरमधील फातिमानगर येथे जुन्या वादातून हवेत २ गोळीबार केल्याची घटना गुरुवारी १० ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता घडली. यात संशयित आरोपी स्वप्नील उर्फ सोपान चांदुसिंग परदेशी (वय-२५, रा.कुसुम्बा ता.जि. जळगाव) याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्यासह एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. त्यानंतर संशयित आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर पुढील चौकशीला सुरुवात करण्यात आली आहे.