गुरूवार, जून 8, 2023

भुसावळमध्ये पुन्हा गोळीबार : २ जण जखमी

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ एप्रिल २०२३ । भुसावळ मध्ये झालेल्या गोळीबारामुळे शहर पुन्हा एकदा हादरले आहे. भुसावळ शहराजवळ असलेल्या साकरी रस्त्यावर काल रात्री उशीरा गोळीबाराची घटना घडली. यात दोन तरूण जखमी झाले आहेत.

जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोळीबार झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व तपासाची चक्रे फिरवण्यास प्रारंभ केला आहे.

भुसावळात मध्यंतरी अनेक टोळ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याने गुन्हेगारीवर काही प्रमाणात तरी नियंत्रण मिळविण्यात आल्याचे दिसून येत होते. मात्र काल रात्री सुमारे साडेनऊच्या सुमारास गोळीबार झाला

गोळीबाराची माहिती मिळताच डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे व तालुका पोलीस स्थानकाचे पोलीस निरिक्षक विलास शेंडे यांनी घटनास्थळी भेट दिली. या गोळीबाराला पूर्व वैमनस्याची किनार आहे का ? या दिशेने तपास सुरू आहे