जळगाव लाईव्ह न्यूज । १३ एप्रिल २०२२ । शहरातील जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या मागील बाजूस असलेल्या मोकळ्या जागेतील गवताला दि १३ रोजी दुपारच्या सुमारास आग लागली. मनपाच्या अग्निशमन बंबाने तत्काळ घटनास्थळ गाठत या आगीवर नियंत्रण मिळवले.
अधिक असे की, शहरातील जिल्हापेठ पोलिस स्टेशनच्या मागील बाजूस पोलीस वसाहत आहे. यापासून काही अंतरावर भारत कंपनीचा पेट्रोलपंप देखील आहे. या परिसरात असलेल्या मोकळ्या जागेतील गवताला दुपारच्या सुमारास अचानक आग लागली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर या परिसरातील नागरिकांनी घटनेची माहिती महापालिकेच्या अग्निशमन विभागाला कळवली. त्यानुसार अग्निशमन बंब तत्काळ घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवले. अग्निशमन विभागाचे वाहनचालक देविदास सुरवाडे, रवी बोरसे, भगवान जाधव यांनी आगीवर नियंत्रण मिळवले.