जळगाव लाईव्ह न्यूज । गौरी बारी । ‘मुले म्हणजे देवाघरची फुले’. मुले आणि गुलाबाची फुले भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना आवडायचे. दरवर्षी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती दिवशी १४ नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा केला जातो. नेहरू यांच्याकडे प्रौढ व्यक्तींसाठी वेळ नव्हता; परंतु त्यांच्याकडे नेहमीच लहान मुलांसाठी वेळ होता. मुलांचे काळजीपूर्वक आणि प्रेमाने पालन पोषण केले पाहिजे. कारण की ते देशाचे भविष्य आणि उद्याचे नागरिक होणार आहेत ते देशाचे सामर्थ्य आणि समाजाचा पाया आहेत,असे त्यांचे म्हणणे होते, भारतात १४ नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा केलाजात असला तरी जगभरात तो २० नोव्हेंबर किंवा १ जून रोजी साजरा करण्यात येतो.
बाल दिनाची सुरुवात कोणी केली?
बालदिनाची पायाभरणी 1925 मध्ये झाली होती आणि 1953 मध्ये त्याला जगभरामध्ये मान्यता मिळाली. 20 नोव्हेंबर रोजी, संयुक्त राष्ट्रांनी (UN) बालदिन साजरा करण्याची घोषणा केली. त्यामुळे भारतात 20 नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा करण्यात आला. पण अनेक देशांमध्ये तो वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो. 1950 प्रमाणे, बालदिन (1 जून) अनेक देशांमध्ये बालदिन म्हणून साजरा केला जातो जो जागतिक बाल दिन म्हणून ओळखला जातो. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1959 मध्ये भारतात पहिला बालदिन साजरा करण्यात आला. परंतु 1964 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतर बालदिन साजरा करण्याची तारीख बदलून 20 नोव्हेंबर ऐवजी 14 नोव्हेंबर करण्यात आली. हा दिवस नेहरू यांचा जन्म दिवस म्हणून ओळखला जातो आणि हा दिवस नेहरू यांना आदरांजली देण्यासाठी साजरा केला जातो.
पंडित नेहरूंना आदरांजली
पंडित नेहरूंना आदरांजली म्हणून बालदिन साजरा केला जातो. ज्यांना प्रेमाने ‘चाचा नेहरू’ म्हणत. त्यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 रोजी झाला होता. त्यांना लहानपणापासूनच छोटी मुले फार आवडत असे त्यांनी 1955 मध्ये लहान मुलांसाठी स्वदेशी सिनेमा तयार करण्यासाठी चिल्ड्रन्स फिल्म सोसायटी इंडियाची स्थापना केली होती. बालदिन म्हणजेच या दिवशी शाळेमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात. त्यामध्ये भाषण आणि निबंध लेखन सारख्या परीक्षा देखील घेतल्या जातात. पंडित नेहरूंनी भारतातील मुलांचे तसेच तरुणांचे शिक्षण, प्रगती, कल्याण आणि विकासासाठी खूप काम केले होते. त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अशा विविध शैक्षणिक संस्था स्थापन केल्या होत्या. भारतातील मुलांना कुपोषणापासून दूर ठेवण्यासाठी शाळेतील मुलांना मोफत प्राथमिक शिक्षण आणि दुधासह मोफत जेवण देण्यात येत असत.
कोरोना अभावी शाळा बंद, लहानमुलांना इंटरनेटने ग्रासले
सध्या काही दिवसापासून लहानमुलांना देखील इंटरनेटने ग्रासले आहे. कोरोना अभावी शाळा बंद असल्यामुळे शिक्षण हे ऑनलाईन पद्धतीने सुरु झालेत आणि बालपण मोबाइलभवती गुंढाळले गेले. परंतु आता निर्बंध कमी झाले असून शाळा देखील सुरु करण्यात आल्या आहेत. ज्यामुळे आता पुन्हा शाळांमध्ये लहानमुले हे फुलांसारखे दिलखुलास जगू शकतात. ब्रिटन हा एकमेव देश आहे जिथे बालदिन साजरा केला जात नाही. त्याच वेळी, 14 नोव्हेंबर रोजी भारतात सार्वजनिक सुट्टी नाही. तथापि, या दिवशी शाळांमध्ये अनेक सांस्कृतिक उपक्रम आणि कार्यक्रम आयोजित केले जातात.