⁠ 
शनिवार, ऑक्टोबर 19, 2024
Home | जळगाव जिल्हा | मुक्ताईनगर | नगरपंचायतीच्या अभियंत्याला धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल

नगरपंचायतीच्या अभियंत्याला धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मे २०२१ । मुक्ताईनगर शहरातील प्रभाग क्रमांक ५ मधील जुन्या गटारीचा प्रवाह सुरु ठेवा, नविन बांधलेली गटार बंद करा असे बोलून रस्त्यावरील दगड गटारीत टाकून पाण्याचा प्रवाह बंद करुन नगरपंचायतीच्या बांधकाम अभियंत्याला मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी खडसे समर्थक भाजप नगरसेविका पुत्र अमीन खान अहमद खान याच्याविरुद्ध बांधकाम अभियंते रितेश भाऊसाहेब बच्छाव यांच्या तक्रारीवरुन भारतीय दंड संहिता १८६ ,506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, मुक्ताईनगर शहरातील प्रभाग क्रमांक ५ मधील भाजप नगरसेविका पुत्र अमीन खान अहमद खान याने गटारीच्या पाण्याच्या प्रवाहाच्या कारणावरुन आजरोजी दिनांक 11/05/2021 रोजी 9:30 ते 10:00 वाजेच्या दरम्यान नगरपंचायतीचे बांधकाम स्थापत्य अभियंते रितेश भाऊसाहेब बच्छाव यांच्याशी हुज्जत घालत कार्यालयात येऊन मारण्याची धमकी दिली.

फिर्यादी व साक्षीदार सचिन मधुकर काठोके बांधकाम लिपिक हे दिनांक ११ रोजी सकाळी 9:30 वाजता शहरातील प्रभाग क्रमांक ५ परिसरातील गटारीचे बांधकाम पाहण्यासाठी गेले असता आरोपी अमीन खान अहमद खान याने ‘गटारीचा प्रवाह पुर्वीप्रमाणे राहूद्या ;नविन बांधकाम केलेली गटार बंद ठेवा’ असे बोलून रसत्यावरील दगड ऊचलून गटारीत टाकून पाण्याचा प्रवाह बंद केला.

त्यानंतर गाडीची चावी काढून आताच गटार बंद करा नाहीतर तुम्हाला नगरपंचायत कार्यालयात येऊन मारेल अशी धमकी दिल्याने तक्रारदार रितेश भाऊसाहेब बच्छाव बांधकाम अभियंता यांच्या तक्रारीवरुन तसेच बांधकाम लिपिक सचिन काठोके याची साक्षीद्वारे भाजप नगरसेविका पुत्र अमीन खान अहमद खान याच्यावर मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहिता १८६ ,506 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सदरील गुन्हा दाखल झाल्यानंतर मुक्ताईनगर नगरपंचायत कर्मचारी वर्गाकडून निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आला तसेच लेखणी बंद ठेवण्यात आली. दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.