⁠ 
शुक्रवार, मे 17, 2024

सॉफ्टवेअरमध्ये परस्पर बदल; तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २० डिसेंबर २०२१ । शहरातील विशाल कॉलनीत खासगी क्लासेसचा डाटा कॉपी करून सॉफ्टवेअरमध्ये परस्पर बदल करून फसवणूक केल्याप्रकरणी दीपाली दीपक भदाणे (वय ५०) या तरुणीविरुद्ध जिल्हा पेठ पोलीसात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

सविस्तर असे की, दीपाली भदाणे ही तरुणी विशाल देवेंद्र चड्ढ्ढा (५०,रा. विशाल कॉलनी) यांच्या क्लासेसमध्ये नोकरीला आहे. विद्यार्थ्यांची माहिती व इतर प्रशासकीय कामाची जबाबदारी तिच्याकडे होती. जून २०१६ ते २०१७ दरम्यान दीपाली भदाणे यांनी चढा यांच्या खासगी क्लासेसच्या विद्यार्थ्यांची यादी इतर व्यक्तींना मेलद्वारे पुरवली सॉफ्टवेअरमध्ये परस्पर बदल करून फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. सहायक पोलीस निरीक्षक किशोर पवार तपास करीत आहेत.

हे देखील वाचा :