जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जानेवारी २०२२ । बोदवड तालुक्यातील येवती येथे वडिलोपार्जित घराच्या वाटणीवरून दोन सख्ख्या भावांमध्ये हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी बोदवड पोलिसांत एकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

येवती येथील रहिवासी तथा फिर्यादी बाबुराव सदाशिव पाटील याच्या वडिलांचे निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात घर व जमिनीची वाटणी करावी यासाठी २० रोजी रात्री ८ वाजता बाबूराव यांनी मधुकर पाटील यांना विचारणा केली. त्याचा राग आल्याने पाटील यांनी बाबूराव पाटील यांना राॅडने मारून हिस्सा मागितला तर ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी बाबूराव पाटील यांच्या फिर्यादीवरून मधुकर पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला.
हे देखील वाचा :
- जळगावच्या रेल्वे उड्डाणपुलावरून ट्रक रिव्हर्स आला अन् झालं मोठं नुकसान.. घटनेचा VIDEO पहा..
- Jalgaon : २५ हजाराची लाच स्वीकारताना ग्राम विकास अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
- मोठी बातमी ! दीड हजाराची लाच घेताना अधिकारी जाळ्यात, जळगाव एसीबीची कारवाई
- बापरे! भुसावळात सराईत गुंडाची हत्या करून जमिनीत पुरले
- Jalgaon : माजी उपसरपंचाच्या खून प्रकरणी एकाला अटक