जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जून २०२४ । रविवारी रात्री जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. यादरम्यान विज पडल्यामुळे पंधरा मेंढ्या मृत्यू झाल्याची घटना शिरसोदे येथे घडली.

रात्रीच्या सुमारास झालेल्या पावसात शिरसोदे येथे मखनापूर पाझर तलाव परिसरामध्ये विज पडल्यामुळे पंधरा मेंढ्या व एक बकरी दगावली. यादरम्यान, मेंढपाळला सुद्धा विजेच्या धक्का बसल्यामुळे दुखापत झाली असून मोठे आर्थिक नुकसान झाले. मेंढ्यांच्या सांभाळ करून उदरनिर्वाह करणाऱ्या दामू भिल या मेंढपाळावर नैसर्गिक संकट कोसळले आहे. यावेळी पशुधन अधिकारी डॉ. योगेश देशमुख यांनी मृत मेंढ्यांचे शवविच्छेदन केले.