जळगाव लाईव्ह न्यूज । २८ सप्टेंबर २०२२ । देशभरात सणासुदीचे दिवस सुरु आहे. पुढील महिन्यात दसरा तसेच दिवाळी सारखे सण साजरे होणारे आहे. अशातच दसरा आणि दिवाळीत रेल्वे गाड्यांमध्ये मोठी होते. याच पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने चार साप्ताहिक सुपरफास्ट रेल्वेगाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या भुसावळमार्गे धावणार असल्याने जिल्ह्यातील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
दिवाळी आणि छटपूजाच्या निमित्ताने रेल्वेगाड्यांमध्ये प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. यात मुंबई-नागपूर साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल ट्रेन नंबर ०१०३३ ही २२ ऑक्टोबर आणि २९ ऑक्टोबरला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून मध्यरात्री १२.२० ला प्रस्थान करेल आणि त्याच दिवशी दुपारी ३.३२ वाजता नागपूर स्थानकावर येईल.
०१०३४ ही रेल्वेगाडी २३ आणि ३० ऑक्टोबरला दुपारी १.३० वाजता नागपूर स्थानकावरून निघेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ४.१० वाजता मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचेल.
या रेल्वेस्थानकावर थांबणार
या रेल्वेगाड्या जाता-येताना दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगांव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामनगाव आणि वर्धा रेल्वेस्थानकावर थांबणार आहेत. या गाडीला दोन एसी टू टियर, ८ एसी ३ टियर, चार शयनयान श्रेणी, ५ सामान्य द्वितीय श्रेणी तसेच गार्ड ब्रेक व्हॅन आणि जनरेटर व्हॅनचा समावेश राहील. या सर्व गाड्यांच्या आरक्षणाची सोय सर्व संगणकीय आरक्षण केंद्रांवर तसेच रेल्वेच्या वेबसाइटवर सुरू झाली आहे.