भुसावळ

भुसावळमध्ये उद्यापासून तीन दिवस वर्षी महोत्सव

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २० मे २०२२ । भुसावळ शहरातील सिंधी कॉलनीतील बाबा तुलसीदास उदासी यांच्या ३९व्या वर्षी महोत्सवाला उद्यापासून म्हणजे (दि.२१) सुरुवात होत आहे. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रम होतील. त्यात राज्यासह मध्य प्रदेश, उत्तरप्रदेश, छत्तीसगड राज्यातून हजारो भाविक सहभागी होतील.

सिंधी कॉलनीतील पूज्य बाबा काशिदास उदासी दरबारात शनिवारपासून (दि.२१) धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात होईल. शनिवारी सकाळी ८.३० ते १०.३० वाजेदरम्यान गुरुद्वारा साहीब भुसावळ येथील भाई गोविंदसिंग यांचे कीर्तन होईल. सकाळी ११ वाजता अखंड पाठसाहीब वाचनाला सुरुवात होईल. सायंकाळी ६ वाजता बाबा तुलसीदास म्युझिकल पार्टीचा भजनांचा कार्यक्रम होईल. रविवारी (दि. २२) सकाळी ९ वाजता ५५ बालकांचे सामूहिक उपनयन (जाणिया) संस्कार होतील. सायंकाळी ७ वाजता धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होतील. सोमवारी (दि.२३) सकाळी ८.३० ते १०.३० दरम्यान शब्द कीर्तन, सकाळी ११ वाजता अखंड पाठसाहीब वाचनाची समाप्ती, दुपारी १ वाजता वर्षी उत्सव, नंतर बाबा तुलसीदास बाबा काशिदास उदासी भक्त निवासात महाभंडारा होईल, असे आयोजकांनी कळवले आहे.

Related Articles

Back to top button