---Advertisement---
जळगाव जिल्हा गुन्हे

दुचाकी घसरल्याने बापाचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज। १८ ऑगस्ट २०२३। जळगाव तालुक्यातील ममुराबाद ते विदगाव रस्त्यावर असलेल्या फार्मसी कॉलेज समोर दुचाकी घसरल्याने दुचाकीस्वाचा मृत्यू झाला तर मागे बसलेला मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी १६ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजून २५ मिनीटांनी घटली. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनोद हरी कोळी रा. इंदिरा नगर, अडावद ता.चोपडा असे मयताचे नाव आहे.

DEATH jpg webp webp

माहिती अशी की, विनोद हरी कोळी हे आपल्या परिवारासह चोपडा तालुक्यातील अडावद येथे वास्तव्याला होते. मजूरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होते. बुधवारी १६ ऑगस्ट रोजी कामाच्या निमित्ताने विनोद कोळी हे त्याचा मुलगा सागर विनोद कोळी याच्या सोबत दुचाकी (एमएच १९ बीव्ही ९१२१) ने जळगावात आलेले होते. काम आटोपून घरी जाण्यासाठी ममुराबाद मार्गे निघाले.

---Advertisement---

रात्री ९ वाजून २५ मिनीटांनी ममुराबाद ते विदगाव रस्त्यावर असलेल्या फार्मसी कॉलेजसमोर अचानक दुचाकीवरील ताबा सुटल्याने दुचाकी घसरली. यात विनोद कोळी हे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचा मुलगा सागर कोळी हा गंभीर जखमी झाला. त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार माणिक सपकाळे करीत आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---