जळगाव जिल्ह्यात पुन्हा भीषण अपघात ; दोन महिला ठार, अनेक मजूर गंभीर जखमी..

जुलै 12, 2025 5:26 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जुलै २०२५ । जळगाव जिल्ह्यात अपघाताच्या दिवसेंदिवस वाढताना दिसत असून अशातच आणखी एका भीषण अपघाताची घटना समोर आली. ज्यात ॲपे रिक्षा आणि टाटा मॅजिक यांच्या समोरासमोर जोरदार धडक झाल्याने झालेल्या अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला तर तर अनेक मजूर गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आज १२ रोजी सकाळी जळोद-अमळगाव रस्त्यावर घडली.

jalod amalgaon accident

नेमकी घटना काय?

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मजूर घेऊन जाणारी एक ॲपे रिक्षा (MH 19 BJ 4365) अमळगावहून जळोदच्या दिशेने जात होती. दरम्यान, समोरून भरधाव वेगात येणाऱ्या टाटा मॅजिक (MH 19 CZ 2522) वाहनाने ॲपे रिक्षाला जोरदार धडक दिली. अपघातात रिक्षा अक्षरशः चुरडून गेली असून त्यामधील प्रवासी अडकून पडले होते.

घटनेनंतर उपस्थित नागरिकांनी जखमींना तातडीने बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि ॲम्ब्युलन्सच्या मदतीने अमळनेर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलीस प्रशासनाकडून मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. जखमी मजूरांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. काही मजुरांवर शस्त्रक्रियेची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now